Today: Last Update:

Welcome Guest | Login | Register

बेपत्ता युवतीचा पोलिसांकडून शोध

Posted by Arvind 0

 भिवंडी ( दि.२६) तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळे येथे राहणारी १७ वर्षीय युवती घरात काही एक न सांगता निघून गेली असता ती अद्यापी घरी परतली नसल्याने या बाबत युवतीच्या आईने तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस या बेपत्ता युवतीचा कसून शोध घेत आहेत. 
  ताराकुमारी संजयकुमार वर्मा ( १७ ) असे बेपत्ता युवतीचे नाव आहे.तिचे वर्णन रंग सावळा , उंची ४ फुट ५ इंच , केस लांब काळे , नाक सरळ , चेहरा लांबट , नाकात चमकी , कानात नकली टोप्स , नेसूस मरून रंगाचा कुर्ता , गुलाबी रंगाची सलवार , गुलाबी रंगाची ओढणी , पायात स्लीपर व सोबत मोबाइल , त्यात सिमकार्ड नाही अशा वर्णनाची युवतीची तब्बेत बरी नसल्याने २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घरात काही एक न सांगता निघून गेली असता ती अद्यापी घरी परतली नसल्याने युवतीची आई किरणदेवी संजयकुमार वर्मा यांनी मुलगी हरवल्या बाबतची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात केली आहे. सदर युवती बाबत कुणाला काही एक माहिती मिळून आल्यास त्याबाबत तत्काळ भिवंडी तालुका पोलिस ठाणे दूरध्वनी क्र .०२५२२-२५१२५० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन तालुका पोलिसानी केले आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक व्ही. एस. शिरसाट करीत आहेत. 

leave a comment

0 comments

Please Login TO Commnet On News