Today: Last Update:

Welcome Guest | Login | Register

भिवंडीत राष्ट्रीय उर्दू परिषदेचे उद्घाटन

Posted by Arvind 0

भिवंडीत राष्ट्रीय उर्दू परिषदेचे उद्घाटन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते संपन्न 
भिवंडी दि. ( २२ ) भिवंडीत कोकण मुस्लिम एज्यूकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या जी. एम. मोमीन गर्ल्स कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भिवंडीत अखिल भारतीय उर्दू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे .  या महासंमेलनाचे उद्घाटन  भारताचे उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . या कार्यक्रमप्रसंगी राज्यपाल के.शंकर नारायण, राज्यशिक्षण मंत्री श्रीमती फौजिया खान , ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक , अल्पसंख्यांक मंत्री आरिफ खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  
        देशाच्या विविध भागात उर्दू भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच उर्दू भाषेच्या उन्नती व प्रगतीसाठी २३ व २४ नोव्हेंबर अशा दोन दिवस जी. एम. मोमीन गर्ल्स कॉलेजच्या प्रांगणात अखिल भारतीय उर्दू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उर्दू भाशेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी एका वेब साईटचे आणि पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी उपराष्ट्रपती हमीद अंसारी व राज्यपाल के.शंकर नारायण यांच्या शुभहस्ते करण्यात आले . 
         उर्दू भाषेची महती व उर्दू भाषेचे महत्व यावेळेस उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. १९४७ नंतर उर्दू भाषे बद्दल अनेकांची नकारात्मक भूमिका होती, मात्र उर्दुने आपले अस्तित्व टिकवून ठेवले. त्याचबरोबर देशात काही ठिकाणी उर्दूला दुर्लक्षित समजले गेले मात्र महाराष्ट्रात उर्दूला नेहमीच सन्मान मिळाला असेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. त्याचबरोबर वृत्तपत्र व प्रसार माध्यमांचीही त्यांनी यावेळी प्रशंसा करीत भारतीय स्वतंत्र लढ्यात वृतपत्रांनी मोलाची कामगिरी बजावली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर उर्दू बद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले असून उर्दू हि केवळ भारत व पाकिस्थांचीच भाषा राहिली नसून ती आंतरराष्ट्रीय भाषा झाली असून उर्दू भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी शिक्षक , पालक व विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले .

leave a comment

0 comments

Please Login TO Commnet On News