Today: Last Update:

Welcome Guest | Login | Register

भिवंडी शिक्षण मंडळातील शिक्षकाचे रिक्त पê

Posted by Arvind 0

भिवंडी शिक्षण मंडळातील शिक्षकाचे  रिक्त पदे त्वरीत भरणार -- फौजिया खान 

भिवंडी   ( दि.२६  ) भिवंडी महापालिका शिक्षण मंडळच्या १०२ शाळांमध्ये २४९ पदे रिक्त असून ती पदे लवकरात लवकर भरली जातील असे आश्वासन शालेंय  शिक्षण राज्यमंत्री फौजीया खान यांनी आपल्या भिवंडी दौरया निमित्त शिक्षण मंडळाला दिलेल्या   भेटीत शिक्षण मंडळाचे सभापती राजु गाजेंगी यांना दिले आहे . त्याच्या या आश्वासनामुळे शिक्षण मंडळातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
      भिवंडी शहर हे अल्प संख्यांक व बहुभाषिक लोकसंख्येचे शहर असून पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या १०२ शाळा आहेत त्यामध्ये ३४ हजार विद्यार्थी  शिकत आहेंत.  शिक्षण मंडळच्या आस्थापनेवर ९९८ मंजुर पायाभुत पदे असून ७४९ शिक्षक कार्यरत आहेत. तर २४९ शिक्षकांची पदे रिक्त आहेत . तसेच बालकांचे सक्तीचे मोफत शिक्षण अधिनियम २००९ अन्वये शिक्षण मंडलास ११६६ प्राथमिक शिक्षकांचे पदे व १०२ अंशकालिन शिक्षकांचे पदे आवश्यक आहेत यासंदर्भात वारंवार शासनस्थरावर लेंखी पत्रव्यवहार झालेले आहेत  मात्र शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकामी शिक्षण मंडळास अनेक अडचनींना तोंड द्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे काही माध्यमांच्या शाळा मध्ये वर्ग खोल्या कमी पडत असल्याने एकाच वर्गात ९० ते १२० विद्यार्थी बसत आहेत.  यासर्व बाबी लक्षात घेता शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजीया खान यांनी नविन वर्ग खोल्या बांधण्याकरीता निधी उपलब्ध करून दिल्यास  विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास बाधा येणार नाही. शहरातील अल्प संख्य विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता अल्प संख्यांक निधीतुन विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था . उच्च प्राथमिक शाळांमधिल  ६ ते ८ वी शाळांच्या विद्यार्थ्यांकरीता विज्ञान प्रयोग शाळा  व संगणक कक्ष आणि ई-लर्निंग शिक्षण व्यवस्था निर्माण करून देण्याची मागणी फौजीया खान यांच्याकडे सभापतींनी लेखी निवेदनाद्वारे करताच शिक्षण मंडळाचे सर्व प्रश्न शासन स्थरावर त्वरीत सोडविण्याचे आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी दिले.  या भेटी दरम्यान शिक्षण मंडळाचे उपसभापती कमिल कारनाले सदस्य राजेश चव्हान माजी सदस्य इरफान पटेल प्रशासन अधिकारी गजानन मंदाडे मुख्याद्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

leave a comment

0 comments

Please Login TO Commnet On News