Today: Last Update:

Welcome Guest | Login | Register

महापालिकेच्या ३२ आरोग्य कर्मचाऱ्याना काय

Posted by Arvind 0

भिवंडी ( दि.२ ८ ) शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात विविध पदांवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याना अस्थापनेवर कायम करण्यासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून टाळाटाळ केली जात असल्याने अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेत काम करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांमध्ये महापालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर उमटला आहे.  महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीकरिता राज्य शासनाच्या निर्देशानुसार एप्रिल २००७ ,सप्टेंबर २००८,फेब्रुवारी २००९,ऑगस्ट २००९,जून २०१०,नोव्हेंबर २०११ या वर्षात आरोग्य सेवेतील ६ डॉक्टर्स ,१७ आरोग्य सेविका,४ मुख्य परिचारिका,१ ल्याब टेक्निशियन ,२ लिपिक,१ डाटाएंट्री,१ अकाउटट अशा पदांवर आरोग्य कर्मचारी करार पद्धतीने आजतागायत काम करीत आहेत या कर्मचाऱ्याना शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार वेतन दिले जात आहे.  मात्र या कर्मचाऱ्याना पालिकेच्या कायम अस्थापनावर घेण्यासाठी महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने या कामगारांचे भवितव्य टांगणीवर असून त्यांना शासकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

leave a comment

0 comments

Please Login TO Commnet On News